लोणचे रेसिपी /pickle recipe
आपल्या दररोजच्या जेवणातील एक महत्वाचा घटक म्हणजे लोणचे होय. जेवणा मध्ये लोणच्याचा समावेश असला तर जेवण करण्याचा आनंद एक वेगळाच आनंद असतो. उन्हाळा संपण्यास सुरुवात झाली की कैरीची लोणचे बनवण्यास सुरुवात होते. कैरीचे लोणचे म्हटले की तोंडाला पानी सुटते. कैरीचे लोणचे खाण्यास अतिशय चविष्ट असते, त्यामुळे लोक कैरीचे लोणचे आवडीने खातात.
Mango Pickle/Amla Pickle/लोणचे रेसिपी /pickle recipe
कैरी सोबतच आवळ्याचे लोणचे सुद्धा आवडीने खाल्ल्या जाते. हे लोणचे एकदा तयार करून बराच वेळ आपण साठवून ठेऊ शकतो. आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत कैरीचे व आवळ्याचे लोणचे कसे बनवायचे.
कैरीचे लोणचे/Mango pickle

साहित्य :
- एक किलो कैरी
- बढीशेप
- मेथी
- मीठ
- मोहरी
- हिंग
- हळद तीन चमचे
- लाल तिखट
- पावभर तेल
कृती :
1) सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्या.
2) कैऱ्या धुतल्यानंतर आपल्याला हवे असले त्या आकाराचे त्यांचे तुकडे करा.
3) नंतर एका मोठ्या भांड्यात कैरीचे तुकडे काढून त्यात हळद आणि मीठ मिक्स करा.
4) आता या लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, मेथी, बारीक करून घ्यावी.
5) यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आणि हळद टाकून फोडणी द्यावी.
6) नंतर हे मिश्रण एक वेगळ्या भांड्यात काढून थंड होऊ द्यावे.
7) त्यानंतर लोणच्याच तयार केलेला मसाला व फोडणी कैरीच्या तुकड्यां मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे.
8) तयार झालेले लोणचे एका भरणीत भरून ठेवावे.
आवळ्याचे लोणचे/ Amla Pickle
साहित्य :
- एक किलो आवळा
- बढीशेप
- मेथी
- मीठ
- मोहरी
- हिंग
- हळद तीन चमचे
- लाल तिखट
- पावभर तेल
कृती :
1) सर्वप्रथम आवळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
2 त्यानंतर आवळ्याचे तुकडे करून घ्या.
3) नंतर एका काढाई मध्ये पानी टाकून आवळ्याचे तुकडे उकळून घ्यावे.
4) आता या लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, मेथी, बारीक करून घ्यावी.
5) यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, आणि हळद, मीठ टाकून फोडणी द्यावी.
6) नंतर हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून थंड होऊ द्यावे.
7) त्यानंतर लोणच्याचा तयार केलेला मसाला व फोडणी आवळ्याच्या तुकड्यां मध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे.
8) तयार झालेले लोणचे एका भरणीत भरून ठेवावे.
आणखी वाचा