Pohe recipe / Pohe kase banavtat / पोहे कसे बनवतात? / How to make poha?

Pohe recipe / Pohe kase banavtat / पोहे कसे बनवतात? / How to make poha?

आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की पोहे कसे बनवतात. पोहे ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नाष्टा रेसिपी आहे. जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात सकाळच्या नाष्टयामध्ये पोहे हे बनवले जातात. पोहे आपल्या शरीराला फॅट्स, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे पुरवतात. पोहे बनवायला जास्त वेळ लागत नसल्यामुळे नाष्टयामध्ये जास्त करून पोहे वापरण्यात येतात. पोह्यामद्धे बटाटा, शेंगदाणे, शेव, असे वेगवेगळे पदार्थ घालून आपण त्यांची चव वाढवू शकतो.

Pohe recipe / पोहा रेसिपी

Pohe recipe
Pohe recipe

साहित्य :

  • दोन वाट्या पोहे
  • 2/3 हिरव्या मिरच्या
  • शेंगदाणे
  • एक वाटी कांदा
  • मीठ
  • कढिपत्ता 
  • 2 चमचे तेल
  • मोहरी
  • हळद, जिरे  
  • हिंग 

कृती :

1) प्रथम पोहे हे पाण्याने भिजवून घ्यावे. आणि त्याला थोडे मीठ लावून घ्यावे. त्यानंतर एक वाटी कांदा बारीक चिरून घ्यावा.

2) त्यानंतर एका पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. तेल थोडेसे तापल्यानंतर त्यात मिरचीचे तुकडे, मोहरी, कढिपत्ता, जिरे, हिंग, हळद, घालावी. त्यानंतर शेंगदाणे टाकावे.

3) त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकावा. त्याला थोडासा लालसर होऊ द्यायचा.

4) या मिश्रणामध्ये भिजवलेले पोहे टाकावे व सर्व मिश्रण हे व्यवस्तीत कालवून घ्यावे.

5) पोहे थोडे वाफेवर होऊ द्यावे.  

6) अशाप्रकारे आपले पोहे तयार होतील.  

7) यात पोहयानची चव वाढवण्यासाठी आपण वरुण एखादे निंबू पिळून घेऊ शकतो.

8) तसेच बारीक शेव सुद्धा चवीनुसार घेऊ शकतो.

बटाटा पोहे

साहित्य :

  • दोन वाट्या पोहे
  • 1 बटाटा
  • 2/3 हिरव्या मिरच्या
  • शेंगदाणे
  • एक वाटी कांदा
  • मीठ
  • कढिपत्ता 
  • 2 चमचे तेल
  • मोहरी
  • हळद, जिरे 
  • हिंग 

कृती :

1) प्रथम पोहे हे पाण्याने भिजवून घ्यावे. आणि त्याला थोडे मीठ लावून घ्यावे. त्यानंतर एक वाटी कांदा बारीक चिरून घ्यावा.

2) त्यानंतर एक पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. तेल थोडेसे तापल्यानंतर त्यात मिरचीचे तुकडे, मोहरी, कढिपत्ता, जिरे, हिंग, हळद, घालावी. त्यानंतर शेंगदाणे टाकावे.

3) त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकावा. त्याला थोडासा लालसर होऊ द्यायचा.

5 त्यानंतर त्यात बटाटा टाका. बटाटा थोडा शिजू द्यावा.

4) या मिश्रणामध्ये भिजवलेले पोहे टाकावे व सर्व मिश्रण हे व्यवस्तीत कालवून घ्यावे.

5) पोहे थोडे वाफेवर होऊ द्यावे.  

6) अशाप्रकारे आपले पोहे तयार होतील.  

7) यात पोहयानची चव वाढवण्यासाठी आपण वरुण एखादे निंबू पिळून घेऊ शकतो.

8) तसेच बारीक शेव सुद्धा चवीनुसार घेऊ शकतो. 

No comments:

Post a Comment

Mango Pickle/Amla Pickle/लोणचे रेसिपी /pickle recipe

       लोणचे रेसिपी / pickle recipe          आपल्या दररोजच्या जेवणातील एक महत्वाचा घटक म्हणजे लोणचे होय. जेवणा मध्ये लोणच्याचा समावेश अस...