Business idea in Marathi/टॉप बिझनेस आयडिया
व्यवसाय म्हटलं की सर्वात महत्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे भांडवल. भांडवलाबरोबरच आपण कोणता व्यवसाय करणार आहोत, त्या व्यवसायात आपल्याला किती नफा होऊ शकतो, तसेच तोटा झाल्यास तो तोटा सहन करण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. व्यवसाय हा नेहमी एकसारखा राहत नाही त्यामध्ये चढ उतार हे चालूच असतात. कोणताही व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्या व्यवसायाच नियोजन करणे गरजेचे असते. भविष्यात आपण आपल्या व्यवसायाला कसे वाढवू शकतो त्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आपण या ब्लॉग मध्ये काही business idea पाहणार आहोत.
![]() |
business idea in marathi |
List of business idea
1) झेरॉक्स दुकान :-
आजच्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीला Xerox काढण्याचे काम पडते. कागदपत्रांशीवाय कोणतेही कार्यालयीन काम पूर्ण होत नाही. त्यासाठी झेरॉक्स दुकान हा एक कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आपण करू शकतो. ह्या व्यवसायासाठी आपल्याजवळ एक झेरॉक्स मशीन असणे गरजेचे आहे.
2) मोबाइल दुरुस्ती :-
प्रत्येक व्यक्तिजवळ आज मोबाइल आहे. मोबाइल शिवाय बहुतांश कामे ही अपूर्णच राहतात. मोबाइल च्या माध्यमातून आपण जगातील कानाकोपऱ्यात संवाद साधू शकतो. दिवसेंदिवस मोबाइल मध्ये आणखी नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा चांगला नफा देऊ शकतो. यासाठी आपल्याला मोबाइल दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
3) पापड उद्योग :-
पापड उद्योग हा एक कमी खर्चात जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. महिला घरच्या घरी पापड लाटून हा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच पापड बनवण्याची मशीन विकत घेऊन सुद्धा हा व्यवसाय केला जाऊ शकतो.
4) किराणा दुकान :-
खेडेगावात तसेच शहरात चालणारा एक महत्वाचा व्यवसाय म्हणजे किराणा दुकान. आपल्या दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तु आपल्याला किराणा दुकानावर मिळतात. हा व्यवसाय फार पूर्वीपासून काही लोक आपल्याला करताना दिसतात. भविष्यात सुद्धा हा व्यवसाय करून आपण एक उत्कृष्ट व्यावसायिक बनू शकतो.
5) ऑनलाइन क्लासेस :-
तंत्रज्ञान आज किती पुढे गेले आहे हे तर आपल्याला माहीत आहेच. ऑनलाइन क्लासेस हा एक महत्वाचा व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायासाठी आपल्याला संगणक तसेच इंटरनेट ची सुविधा असणे गरजेचे आहे. इंटरनेट च्या माध्यमातून आपण ऑनलाइन क्लासेस घेऊ शकतो.
6) ब्युटी पार्लर :-
महिलांसाठी ब्युटी पार्लर हा एक महत्वाचा व्यवसाय आहे. ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी त्यविषयीचे प्रशिक्षण घेणे घरजेचे आहे. ब्युटी पार्लर हा कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.
7) जीम चालवणे :-
प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराचा फिटनेस मेंटेन ठेवायचा असेल, तर त्याला व्यायाम करणे गरजेचे आहे. जीम चालवण्यासाठी आवश्यक अशी ईक्विपमेंट आपल्याला खेरेदी करून ती व्यवस्तीत सेट करावी लागणार आहे. आपण प्रत्येक सभासदासाठी आवश्यक ती फी चार्ज करून चांगला नफा मिळवू शकतो. यासाठी आपल्याला व्यवस्तीत लोकेशन निवडणे गरजेचे आहे.
8) आइस क्रीम पार्लर :-
आजकाल प्रत्येक ऋतूमध्ये आइस क्रीम ला मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. या व्यवसायासाठी आपल्याला एक फ्रीज ची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
9) सीझनल बिझनेस :-
एक वर्षात आपल्याला अनेक सण-उत्सव पाहायला मिळतात. प्रत्येक सणाला बाजारपेठेत विविध वस्तूंची मागणी असते. जसे की रक्षाबंधन ला राख्या या प्रमाणे आपण प्रत्येक सणाला वेगवेगळ्या वस्तु विकून एक चांगला व्यवसाय करू शकतो.
10) कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर :-
आजच्या या युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणकाशी संबंधित बहुतांश कोर्स उपलबद्ध आहेत. यामध्ये प्रत्येक कोर्स ची फी तुम्ही चार्ज करू शकता. बहुतांश नोकऱ्या आज संगणकाशी संबंधित आहेत. त्यामुळे हा व्यवसाय भविष्यात एक उत्तम व चांगला नफा मिळवून देणारा ठरू शकतो.
आणखी वाचा
No comments:
Post a Comment